Bhoomi Land Records फक्त १०० रुपयांत शेत जमीन नावावर करा

Bhoomi Land Records : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता वडिलोपार्जित जमीन अथवा संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही, असा शासनाचा नवीन शासन निर्णय GR आलेला आहे. जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र Land Record आता फक्त शंभर रुपयांमध्ये करता येणार आहे. यासंबंधीची सर्व माहिती आजच्या या लेखात आपण पाहूया.

 

वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे एक आदेश जारी करण्यात आला आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की हिंदू कुटुंब पद्धतीने नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत. आणि हे फक्त १०० रुपयांमध्ये करता येणार आहे.

 

 

वडिलोपार्जित जमीन फक्त शंभर रुपयात नावावर

 

शासनाच्या या नवीन निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे .त्यासोबतच पहिल्या शासन निर्णयानुसार जास्त मुद्रांक शुल्क लागत असल्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती ही कुमकुवत होत चालली होती यामुळे या नवीन शासन निर्णयामुळे शेतकरी बांधवांचा फायदाच होणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की, वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा पैसा देखील खूप वाया जातो. त्याचबरोबर त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जातो. या सोबतच वडिलोपार्जित जमीन मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने सुधारित शासन निर्णय काढला असून या शासन निर्णयानुसार तुम्हाला फक्त शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरून जमीन तुमच्या नावावर करता येणार आहे.

या अधिकाराचा वापर करून फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलेही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम ८५ नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतराची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment