या आंब्यांची किंमत प्रति किलो 4500 रुपये इतकी, येथे पहा पूर्ण माहिती

आंबा’ हा फळांचा राजा म्हटला जातो. हापूस आंबा सर्वात प्रसिद्ध आहे. भारतातील विविध प्रदेशातील आंब्यांचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. दसरी, चौसा आणि लंगडा ही आंब्याची नावं तुम्ही ऐकली असतील. मात्र पश्चिम बंगालच्या एका पठ्ठ्याने तर हे सर्व आंबे सोडून चक्क अमेरिका आणि थायलंडचे आंबे पिकवून लोकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज भागात राहणारे दयाळ सरकार लंगडा हे पूर्वी परंपरागत आंब्याची शेती करायचे, मात्र नंतर त्यांनी आपला मार्ग बदलून थेट परदेशी आंब्यांचं उत्पादन घ्यायचं ठरवलं. पाल्मर आणि बनाना जातीचे आंबे विकून लखपती व्हायचं त्यांचं स्वप्न आहे.

जवळपास मागील तीन वर्षांपासून दयाळ विदेशी आंब्यांचं उत्पादन घेत आहेत. हे आंबे विकून त्यांना मिळणारा नफा हा नेहमीच्या आंब्यांपेक्षा 5 ते 6 पटीने अधिक असतो. त्यामुळे परंपरागत नाही, तर विदेशी आंब्यांचं उत्पादन घेण्याच्या त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेच्या पाल्मर आंब्याबाबत बोलायचं झालं तर, याचा रंग लालसर असतो. उत्पन्नाबाबत विचार केल्यास या आंब्यांची किंमत प्रति किलो 4500 रुपये इतकी आहे.

जगातल्या सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणना होणाऱ्या नाम दोक माई आंब्याचे चाहते जगभरात आढळतात. त्याचा रंग पांढरा असल्याने तो अतिशय आकर्षक दिसतो. बाजारात या आंब्याची किंमत प्रति किलो 2100 रुपये इतकी आहे. थायलंडमध्ये मिळणारा बनाना आंबा अतिशय चविष्ट असतो. चवीबरोबरच याचा सुगंधही मोहक असतो. दिसायला केळ्यासारखा असल्याने या आंब्याला बनाना म्हटलं जातं. त्याचा रंग पिवळा-गुलाबी असतो.

या सर्व आंब्यांसह दयाळ सरकार यांच्या बागेत कटिमॉन आंबादेखील आहे. त्यांनी सांगितलं की, सर्व आंब्यांप्रमाणे हा आंबाही चविष्ट असतो. हे सर्व आंबे महागडे आहेत कारण त्यांमध्ये पोषक तत्त्वही भरपूर प्रमाणात असतात. शिवाय आपल्या वातावरणात पिकणारे विदेशी आंबे आकारानेही मोठे असतात. अर्थातच त्यांची विशिष्ट प्रकारे देखभालही करावी लागते. दरम्यान, जगातला सर्वात महागडा आंबा म्हणजे जपानचा ‘मियाजाकी’ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा जवळपास प्रति किलो 2.75 लाख रुपयांना विकला जातो. त्याचं एक रोप एक हजार रुपयांना मिळतं.

 

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment