Petrol Diesel rate पेट्रोल डिझेल स्वस्त नवीन दर जाहीर…

Petrol Diesel rate 9/07/2023 आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली असून ती प्रति बॅरल 86.55 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. तसेच, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा दर 0.21 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 82.99 डॉलरवर पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील याची शक्यता तुर्तास कमी आहे. मे 2022 मध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही पेट्रोल पंपवर गेलात तर तुम्हाला नव्या दिवसाच्या दरात पेट्रोल मिळूते. एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोलची किंमत वाढते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आपण पाहतो.=

ओपेक प्लस देशांनी घेतला निर्णय

OPEC आणि सहकार्य देश (OPEC Plus), पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना, कच्च्या तेलाच्या (पेट्रोल डिझेलच्या किंमती) कमी झालेल्या किमतींना गती देण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांनी पुढील वर्षापर्यंत उत्पादनात कपात सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. सुरुवातीला रशियाला हा निर्णय मान्य नव्हता पण नंतर त्यानेही या निर्णयाला संमती दिली. त्याचबरोबर अमेरिकेसह पाश्चात्य देश तेल उत्पादन वाढवण्याची मागणी ओपेक देशांकडे कर

Leave a Comment