Petrol Diesel rate पेट्रोल डिझेल स्वस्त नवीन दर बदलले…

Petrol Diesel rate  रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर गाडीत पेट्रोल भरण्यापुर्वी त्याचे दर जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर झालेला दिसून येत आहे. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डीझेलचे आजचे नवे दर जाहीर केले आहेत. आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. चेन्नईमध्ये 102.63 रुपये, दिल्लीमध्ये 96.72 रुपये, कोलकातामध्ये 106.03 रुपये दराने पेट्रोल मिळत आहे. तर डिझेल चेन्नईमध्ये 94.24 रुपये, दिल्लीमध्ये 89.62 रुपये, कोलकातामध्ये 92.76 रुपये प्रतिलीटर दराने मिळत आहे.

Petrol Diesel rate 9/07/2023 आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली असून ती प्रति बॅरल 86.55 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. तसेच, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा दर 0.21 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 82.99 डॉलरवर पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील याची शक्यता तुर्तास कमी आहे. मे 2022 मध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही पेट्रोल पंपवर गेलात तर तुम्हाला नव्या दिवसाच्या दरात पेट्रोल मिळूते. एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोलची किंमत वाढते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आपण पाहतो.

ओपेक प्लस देशांनी घेतला निर्णय

OPEC आणि सहकार्य देश (OPEC Plus), पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना, कच्च्या तेलाच्या (पेट्रोल डिझेलच्या किंमती) कमी झालेल्या किमतींना गती देण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांनी पुढील वर्षापर्यंत उत्पादनात कपात सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. सुरुवातीला रशियाला हा निर्णय मान्य नव्हता पण नंतर त्यानेही या निर्णयाला संमती दिली. त्याचबरोबर अमेरिकेसह पाश्चात्य देश तेल उत्पादन वाढवण्याची मागणी ओपेक देशांकडे करत आहेत.

मोबाइलवर पाहा दर

आता पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या मोबाइलवर देखील पाहू शकता. यासाठी तुमच्या मोबाइलवरुन एक एसएमएस पाठवण्याची गरज आहे. यानंतर काही मिनिटातच तुम्हाला आजचे पेट्रोल डिझेलचे दर कळू शकणार आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये जा आणि इंडियन ऑइल (IOC) ग्राहक SP<डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे HPCL (HPCL) ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 922201122 या क्रमांकावर पाठवा. तर BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.

Leave a Comment