Maharashtra Rain Updates महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

Maharashtra Rain Updates देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही.

Maharashtra Weather Forecast देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला आहे. तर बुधवारी, १८ ऑक्टोबरला राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सून माघारी परतला आहे. आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग आणि तेलंगणाचे उर्वरित भागातूनही मान्सूनने माघार घेतली आहे. मंगळवारी नैऋत्य मान्सूनने बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारत, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगाल आणि आंध्र प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण दिसून येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment