Insurance Schemes: केंद्र सरकारची महत्वाची पॉलिसी, फक्त 436 रुपयात 2 लाखांचा विमा

Insurance Schemes प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेंतर्गत, तुम्ही फक्त रु. 436 मध्ये दोन लाखांचे जीवन विमा संरक्षण मिळवू शकता

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या आहेत, मात्र त्याबाबत अनेकांना माहिती नाही. देशातील सामान्य नागरिकांसाठी सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY Insurance Schemes) नावाची योजना सुरू केली आहे. ही अशीच एक योजना आहे जी अत्यंत किफायतशीर दरात जीवन विमा पॉलिसी देते. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) अंतर्गत, पॉलिसी खरेदी करणारी व्यक्ती कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतच्या जीवन विमा संरक्षणासाठी दावा करण्यास पात्र आहे. जीवन विमा पॉलिसी १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकतात. पॉलिसी खरेदी केल्यानंतर ४५ दिवसांनंतर पॉलिसी अंतर्गत कव्हरेज प्रभावी होईल.

nsurance Schemes: प्रति वर्ष प्रीमियम किती आहे?

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment